वार्ताहर /सांबरा
बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या प्रचारार्थ पंतबाळेकुंद्री येथे काढण्यात आलेल्या प्रचारफेरीत महिलांचा लक्षणीय सहभाग होता. गावातील प्रमुख मार्गांवरून पदयात्रा काढण्यात आली. यावेळी श्रीपंत महाराजांच्या मंदिराला भेट देऊन लक्ष्मी हेब्बाळकर यांनी आशीर्वाद घेतला. त्यानंतर गावातील सर्व मतदारांच्या गाठीभेटी घेऊन मतयाचना करण्यात आली. प्रचारफेरीमध्ये महिलांसह पुरुषांची संख्याही अधिक होती. प्रचारफेरीत ता. पं. माजी अध्यक्ष शंकरगौडा पाटीलसह जि. पं. माजी सदस्य नागेश देसाई, मैनू अगसीमनी, गुलाबी कोलकार, अफसर जमादार, होनगौडा पाटील, जमील काजी, मलिक मणियार, मोहम्मद जमादार, शरीफ सनदी, विनय पाटील, शिवलिंग हिरेमठ, रसूल मकानदार, प्रेम कोलकारसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. य् ाावेळी महालक्ष्मीपुरम, केएसआरटीसी कॉलनी व इंडाल कॉलनीमध्ये काढण्यात आलेल्या पदयात्रेमध्ये लोकांनी स्वयंस्फूर्तीने भाग घेऊन लक्ष्मी हेब्बाळकर यांना पाठिंबा दर्शविला.









