मालवण / प्रतिनिधी
आरोग्य उपकेंद्र कोळंब व ज्येष्ठ नागरिक संघ कोळंब यांच्या संयुक्त सहभागातून कोळंब आरोग्य उपकेंद्रात रक्त तपासणी व ब्लड प्रेशल तपासणी करण्यात आली.थायोराईड टेस्ट, हिमोग्लोबिन, ब्लड तसेच प्रथम स्टेज कॅन्सर तपासणी करण्यात आली. या शिबिराचा लाभ 45 ग्रामस्थानी घेतला.आरोग्य शिबीर व आजच शिक्षक दिन असल्यामुळे गुरुवर्य श्री रघुनाथ शेवडेसर, श्री बापू लाडसर, श्री प्रतापसिंह खोतसर व श्री अंकुश कनेरकरसर यांचा सत्कार करण्यात आला तसेच गोखलेसरांच्या घरी जाऊन त्यांचा व त्यांच्या पत्नी गोखलेबाईचा सत्कार करून आशीर्वाद घेण्यात आला.आरोग्य विषयी माहिती सांगताना Dr. प्रशांत पवार यांनी विविध आरोग्य योजनाची सविस्तर माहिती सांगितली.श्री रघुनाथ शेवडे सरांनी डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांचं विशेष कौतुक करताना जगावर आलेल्या कोरोना संकटात त्यांनी आपल्या प्राणाचीही परवा न करता लोकांचे जीव वाचवले व आरोग्य सेवा दिली.
तसेच शिक्षक या चार भिंतीतील फक्त शिकवणाऱा ही व्याख्या नसून प्रथम आपली आई वडिल नंतर समाजात वेगवेगळे आपल्या संपर्कात आलेला प्रत्येक माणूस आपल्याला काहींना काही शिकवत असतो ते सर्व शिक्षक आहेत. लाडसर, खोतसर व कनेरकर सरांनी आरोग्य निरोगी राहण्यासाठी योग शिबीर व योगा करने आवश्यक आहे. व ते सर्वांनी करावे असे आवाहन केले.कातवड शाळा येथ लवकरच योग शिबीर भरवण्याचे विचार कनेरकर सरांनी व्यक्त केला.आरोग्य सेवक श्री कृष्णा मॅजिक, ऐनसिडी स्टाफ प्रथमेश वयागावकर, लॅब असिस्टंट नितीन कदम, सीमा मेहता व लाड मॅडम यांनी आरोग्य सेवा पुरविली.
यावेळी वाचनालयाचे अध्यक्ष सुनील फाटक, सुंदर परब, बापू बावकर, गुरूदास परब, वाचनालयचे सचिव मानसिंग लाटकर, ग्रामपंचायत सदस्य सौ नंदा बावकर, दिपा फाटक, मेधा शेवडे, सौ.मंगल परब, दीपक कवटकर, प्राची पेडणेकर, सरिता पेडणेकर, कविता वेंगुर्लेकर, लावण्य सारंग, हेमंत मेथर, दीपिका कवटकर, व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.









