सावंतवाडी । प्रतिनिधी
सैनिकी परंपरा लाभलेल्या कलंबिस्त सारख्या गावात आरोग्य शिबीर भरविण्यात आले आणि त्या शिबिराला उत्तम प्रतिसाद मिळाला . येत्या काळात निश्चितपणे कायमस्वरूपी आरोग्य शिबिर संस्थेच्या माध्यमातून भरवले जाईल . आरोग्याच्या बाबतीत हा गाव सुदृढ बनवण्याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करू असे त्यांनी स्पष्ट केले असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते संजू विरनोडकर यांनी यावेळी येथे केले कलंबिस्त पंचक्रोशी दुग्ध व्यवसायिक संस्था मर्यादित कलंबिस्त,ग्रामपंचायत , कलंबिस्त हायस्कूल व भांडुप येथील विजय क्रीडा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने कलंबिस्त हायस्कूल येथे आयोजित करण्यात आलेल्या मोफत नेत्र तपासणी आणि आरोग्य शिबिरात ते बोलत होते . या आरोग्य शिबिरात जवळपास दीडशेहून अधिक जणांची तपासणी करण्यात आली. या भागात विशेष करून नेत्र आजार समस्या अधिक आहे या शिबिरातून निदर्शनास आले. तसेच हा भाग आरोग्य , शैक्षणिक, पशुसंवर्धन कृषी विकास या त्रिसूत्री कार्यक्रमानुसार एक पायलट प्रोजेक्ट राबवून कलंबिस्त पंचक्रोशीत निश्चितपणे उपक्रम राबवण्यात येतील असे ठरवण्यात आले.या कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन करून उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष. शिवाजी सावंत व सामाजिक कार्यकर्ते संजू विरनोडकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर कलंबिस्त दुग्ध संस्थेचे चेअरमन एडवोकेट संतोष सावंत ,सरपंच सपना सावंत, उपसरपंच सुरेश पास्ते, मुख्याध्यापक अभिजीत जाधव, राजे प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष तळवणेकर,कल्याण कदम. ,संतोष कासले, सूर्यकांत उर्फ बाळा राजगे. डॉ. ए एस. यादव, डॉ दत्तकुमार कोयंडे ,डॉ कांचन विरनोडकर,डॉ. प्रथमेश पई. डॉ पार्थ पई , दत्ताराम कदम, रमेश सावंत ,प्रकाश तावडे ,दीपक विरनोडकर. ,प्रशांत विरनोडकर, सौ रिया सावंत, दीपक जाधव . सौ अर्चना सावंत , अनिल सावंत, दिनेश सावंत, श्री पांगम गुरुप्रसाद सावंत ,पांडुरंग सावंत आधी उपस्थित होते
यावेळी.प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना श्री विरनोडकर म्हणाले ग्रामीण भागात आरोग्य धनसंपदा मिळावी या दृष्टीने आपण यश विरनोडकर स्मृती मोफत आरोग्य शिबिर भांडुप येथील विजय क्रीडा मंडळाच्या माध्यमातून भरवण्याचा संकल्प केला. सह्याद्री पट्ट्यातील कलंबिस्त माजी सैनिक परंपरा असलेल्या भागात दुग्ध सोसायटी आणि ग्रामपंचायत व हायस्कूल यांनी संयुक्त विद्यमाने हे शिबिर यशस्वी करून दाखवले येथील लोकांच्या आरोग्यदृष्ट्या त्यांना सुदृढ बनवण्यासाठी संस्थेने घेतलेले परिश्रम आणि घेत असलेले उपक्रम कौतुकास्पद आहेत . यावेळी दुग्ध संस्थेचे चेअरमन एडवोकेट संतोष सावंत यांनी कलंबिस्त भागातील शेतकरी वर्ग तसेच सर्वसामान्य गोरगरीब जनतेच्या सेवेसाठी ही संस्था नेहमी कार्यरत आहे या भागात तरुण-तरुणींना पशुसंवर्धनाच्या माध्यमातून त्यांच्या हाताला काम देण्याचा आमचा मानस आहे. त्याचबरोबर येथील नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी आम्ही सातत्याने आरोग्य शिबिराच्या माध्यमातून जनजागृती करत आहोत. पशुसंवर्धन ,कृषी ,शिक्षण आणि आरोग्य अशा तीन क्षेत्रात आम्हाला भरीव असे असे काम करायचे आहे आणि त्या दृष्टीने आमचे छोटे पाऊल आहे शासनाचे विविध उपक्रम राबवले जात आहेत असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी शिवसेनेचे जिल्हा संघटक तथा माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्या माध्यमातून चष्मा वाटप करण्यात आले सूत्रसंचालन शिक्षक किशोर वालावलकर व आभार मुख्याध्यापक अभिजीत जाधव यांनी मानले.









