भगवेमय वातावरणामुळे तरुणाईसह बालचमूंत नवचैतन्य : दौडीचे ठिकठिकाणी भव्य स्वागत
खानापूर : खानापुरातील शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्यावतीने सुरू असलेल्या दुर्गादौडीचे चौथ्या दिवशी अभूतपूर्व स्वागत करण्यात आले. शिवस्मारक येथील शिवाजी महाराज मूर्तीची पूजा राजेंद्र चित्रगार आणि अनिल धाकूरकर यांच्या हस्ते करण्यात आली. त्यानंतर दौडीच्या ध्वजाची पूजा करून दौडीला प्रारंभ करण्यात आला. शिवस्मारक, रुमेवाडी क्रॉस येथे दौडीचे भव्य स्वागत करण्यात आले. यानंतर दौड मलप्रभा नदी पुलावरुन मारुतीनगर येथे आली. या ठिकाणी महिलांनी आरती ओवाळून दौडीचे स्वागत केले. दौड बेंद्रे खुट्ट, घाडी गल्ली येथून गुरव गल्लीत आली. घरोघरी महिलांनी आरती ओवाळून ध्वजाचे पूजन केले. यानंतर दौड बाजारपेठेतील बसवेश्वर मंदिरात आरती करून नगारखाना मार्गावरुन रवळनाथ मंदिरात आली. या ठिकाणी दुर्गादेवीची आरती आणि प्रेरणामंत्र होऊन दौडीची सांगता झाली.
दौडीचा उद्याचा मार्ग
शुक्रवार दि. 20 रोजी श्री शिवस्मारक, हायवे रोड, विद्यानगर, स्टेशनरोड, पोलीस क्वॉर्टर्स, दुर्गानगर, केएसआरपी रोड, वाजपेयीनगर, श्री दुर्गादेवी मंदिर येथे समाप्ती.









