वार्ताहर/उचगाव
कल्लेहोळ येथील शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्या विद्यमाने दुर्गामाता दौड सालाबादप्रमाणे यावर्षीही गावातील युवक युवतीनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. देव, देश आणि धर्मासाठी लढणारी आणि भारतमातेचे रक्षण करण्यासाठी ही उगवती पिढी घडण्यासाठी म्हणून दुर्गामाता दौडची सुऊवात करण्यात आली आहे. सर्वत्र भगवेमय वातावरण तयार झाले होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीच्या प्रांगणातून या दौडीला सुऊवात करण्यात आली. रांगोळ्याचे सडे, भगव्या पताका, ध्वज यामुळे संपूर्ण गाव भगवेमय करण्यात आले होते. या दौडीला गावातील युवक युवतींनी भरभरून प्रतिसाद दिला.









