राजदीप बिल्डर्सचे मालक राजेश तारकर यांचे प्रतिपादन : बांबोळीतील हेडगेवार विद्यालयात गुऊपौर्णिमा साजरी
पणजी : माणसाच्या जीवनात अध्यात्माला कमालीचे महत्त्व आहे. आध्यात्मिक शक्तीविना माणूस काहीच साध्य करू शकत नाही, असे उद्गार उद्योजक तथा राजदीप बिल्डर्सचे मालक राजेश तारकर यांनी काढले. कुजिरा-बांबोळी येथील डॉ. के. ब. हेडगेवार विद्यालयात गुऊपौर्णिमानिमित्त आयोजित गुऊपूजन कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक विलास सतरकर, विद्यालयाच्या प्रमुख शिक्षिका वरदा नास्नोडकर व सुनिता बांदोडकर व्यासपीठावर उपस्थित होत्या. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी गुऊभजन सादर करून शिक्षकांना शुभेच्छा दिल्या. शिक्षकांनी व्यासमुनींच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली. विद्यार्थी वर्धन मळीक, खुशी नार्वेकर, श्रेयसी नाईक, इशानी देसाई यांनी गुऊपौर्णिमेचे महत्त्व स्पष्ट केले. प्रत्येक व्यक्तीमध्ये गुरूसारखी परोपकारी वृत्ती असावी असा बोध शिक्षक आत्माराम उमर्ये ह्यांनी समारोपपर भाषणात दिला. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात गुऊपौर्णिमेचे औचित्य साधून दहावी इयत्तेत उत्तीर्ण झालेल्या 129 मुलांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. या वेळी राजदीप बिल्डर्सचे सर्वेसर्वा राजेश तारकर प्रमुख अतिथी या नात्याने तसेच विद्यालयाचे व्यवस्थापक सुभाष देसाई व पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत वायंगणकर उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम या गीताने करण्यात आली.









