मुंबई
हवाई क्षेत्रातील कंपनी स्पाइसजेटचे समभाग सलगच्या घसरणीच्या प्रवासानंतर बुधवारी तेजीकडे वळताना दिसून आले आहेत. गेले सहा दिवस हा समभाग घसरणीत होता. स्पाइसजेटचे समभाग बुधवारी शेअरबाजारात 3.42 टक्के वाढीसह 24.99 रुपयांवर बीएसईवर खुले झाले होते. गेल्या काही सत्रात हा समभाग दबावात असून पुन्हा सलग तेजी राखणार का हे मात्र सांगता येत नसल्याचे तज्ञांनी म्हटले आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी सावध राहणेच योग्य ठरणार आहे.









