मुंबई
हवाई क्षेत्रात कार्यरत कंपनी स्पाइसजेटचा समभाग शेअरबाजारात वेग घेताना दिसत आहे. सदरचा कंपनीचा समभाग बीएसईवर इंट्रा डे दरम्यान 6.95 टक्के वाढत 29.40 रुपयांवर पोहचला होता. याआधीच्या सत्रात कंपनीचा समभाग 27.49 रुपयांवर बंद झाला होता. कंपनीचे बाजार भांडवल मूल्य अशाप्रकारे 1736.93 कोटी रुपयांवर पोहचले होते. विमानांकरीता नुकताच कंपनीने नॉर्डीक एव्हिएशन कॅपीटलशी करार केला असल्याचे समजते.









