मुंबई :
शुक्रवारी एकदम तेजीत असलेला स्पाइसजेटचा समभाग सोमवारी शेअरबाजारात मात्र कोलांटी उडी घेताना दिसला आहे. सदरचा कंपनीचा समभाग सोमवारी 11 टक्के इतका घसरत 38 रुपयांवर खाली आला होता. याचदरम्यान इंडिगोचे सहसंस्थापक व माजी प्रवर्तक राकेश गंगवाल यांनी स्पाइसजेटमध्ये हिस्सेदारी घेण्याचे वृत्त शुक्रवारी प्रसिद्ध झाले होते, त्यामुळे त्यादिवशी समभाग तेजीत होता. पण गंगवाल यांनी हिस्सेदारी घेण्याबाबतचे वृत्त फेटाळल्यानंतर सोमवारी समभाग घसरणीला लागलेला दिसला.









