मुंबई
हवाई क्षेत्रातील कंपनी स्पाइसजेटचे समभाग मंगळवारी शेअरबाजारात घसरणीत असताना दिसले. मंगळवारी कंपनीचे समभाग 5 टक्के खाली येत 38.24 रुपयांवर एनएसईवर व्यवहार करत होते. माजी प्रवर्तक कलानिधी मारन यांनी 100 कोटी रुपये भरण्याचे आश्वासन दिले आहे. या आश्वासनाचा परिणाम समभागावर नकारात्मक दिसला. 5 वर्षात हा समभाग 49 टक्के कोसळला असून गेल्या 6 महिन्यात मात्र समभाग 16 टक्के इतका वाढला आहे.









