ऑनलाईन टीम / तरुण भारत :
स्पाईसजेटचे बोईंग 737 विमान शनिवारी मुंबईतून गोरखपूरसाठी उड्डाण करत होते. त्याचवेळी विमानाच्या समोरच्या काचेला तडे गेल्याचे पायलटच्या निदर्शनास आले. अशा परिस्थितीत उड्डाण करणे धोकादायक असल्याने हे विमान पुन्हा मुंबई विमानतळावर सुरक्षितपणे उतरविण्यात आले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.
स्पाईसजेटचे बोईंग 737 विमान एसजी-385 हे मुंबई-गोरखपूर असा प्रवास करणार होते. हे विमान टेकऑफसाठी निघाले. मात्र, विमानाच्या समोरच्या काचेला तडा गेल्याचे पायलटच्या निदर्शनास आले. काचेला मोठे तडे गेल्याने विमानाचे उड्डाण करणे धोकादायक होते. पायलटने तात्काळ ही माहिती एअर ट्राफिक कंट्रोलला दिली. त्यानंतर हे विमान अर्ध्या वाटेतून परत आणण्याचा निर्णय पीआयसीने घेतला. हे विमान हवेत झेपावण्यापूर्वीच माघारी परतले. सर्व प्रवाशांना सुखरुप खाली उतरविण्यात आले. त्यामुळे पुढील धोका टळला.








