प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव विमानतळ परिसरात उभारण्यात येत असलेले फ्लाईंग टेनिंग ऑर्गनायझेशन (एफटीओ)च्या कामाला पुन्हा एकदा गती आली आहे. एफटीओ मंजूर झालेल्या दोन्ही कंपन्यांनी हँगर उभारणीच्या कामाला सुरुवात केली आहे. पावसामुळे मध्यंतरी काम रखडले होते. परंतु आता पुन्हा काम सुरू करण्यात आले आहे.
दिल्ली येथील रेडबर्ड व बेंगळूर येथील समर्वधने या दोन कंपन्यांना बेळगावमध्ये एफटीओ मंजूर झाले आहेत. बेळगावसोबत मंजूर झालेल्या गुलबर्गा व जळगाव येथील एफटीओ सुरू झाले तरी बेळगावमध्ये कामही सुरू न झाल्याने अनेकांनी टीकेची झोड उठविली होती. विमानतळाच्या धावपट्टीपासून ते एफटीओपर्यंतच्या टॅक्सी ट्रकचे काम पूर्ण होऊनदेखील वेळकाढूपणा सुरू होता.
पावसामुळे जुलै महिन्यात कामाला बेक लागला होता. सध्या पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे हँगर उभारणीचे काम सुरू आहे. बुधवारी विमानतळाचे संचालक राजेशकुमार मौर्य यांनी हँगर उभारणीच्या कामाची पाहणी केली. तसेच एफटीओचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना करण्यात आल्या.









