वृत्तसंस्था/कोलंबो
2 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या यजमान लंका आणि भारत यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी कर्णधार रोहित शर्मा तसेच विराट कोहली व अन्य काही खेळाडूंसाठी खास प्रशिक्षण सरावाचे शिबिर घेतले जाणार आहे.
भारतीय टी-20 संघाचा कर्णधार सुर्यकुमार यादव या शिबिरात टी-20 मालिकेतील मंगळवारच्या तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यानंतर दाखल होईल. या टी-20 मालिकेत भारताने लंकेवर 2-0 अशी विजयी आघाडी मिळविली आहे. रोहित शर्मा, विराट कोहली आणि कुलदीप यादव जवळपास महिनाभराच्या कालावधीनंतर या सराव शिबिरात दाखल होणार आहे. या सराव शिबिरात सहाय्यक प्रशिक्षक अभिषेक नायरचे मार्गदर्शन लाभणार आहे. वनडे मालिकेतील सर्व सामने प्रेमदासा स्टेडियमवर खेळविले जातील. या मालिकेतील पहिला सामना 2, दुसरा सामना 4 आणि तिसरा सामना 7 ऑगस्टला होणार आहे.









