बेळगाव : गणेशोत्सवासाठी गावी येणाऱ्या भाविकांना नैर्त्रुत्य रेल्वेने दिलासा दिला आहे. गणेशोत्सवाच्या काळात बेंगळूर-बेळगाव मार्गावर विशेष रेल्वे धावणार आहे. गणेश चतुर्थीवेळीच्या सर्वच रेल्वेंचे बुकिंग फुल्ल असल्यामुळे जादा गाडी सोडण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. रेल्वे क्रमांक 06571 व 06572 ही एक्स्प्रेस शुक्रवार दि. 22 ऑगस्ट रोजी सायंकाळी 7 वा. बेंगळूर येथून निघणार असून दुसऱ्या दिवशी सकाळी 7.30 वा. बेळगावला पोहोचेल. परतीच्या प्रवासात शनिवार दि. 23 रोजी सायंकाळी 5.30 वा. एक्स्प्रेस बेळगावमधून निघून दुसऱ्या दिवशी पहाटे 5 वा. बेंगळूरला पोहोचेल.
रेल्वे क्रमांक 06573 व 06574 एक्स्प्रेस मंगळवार दि. 26 रोजी सायंकाळी 7 वा. बेंगळूर येथून निघणार असून दुसऱ्या दिवशी सकाळी 8.25 वा. बेळगावला पोहोचेल. परतीच्या प्रवासात बुधवार दि. 27 रोजी सायंकाळी 5.30 वा. एक्स्प्रेस बेळगावमधून निघून दुसऱ्या दिवशी पहाटे 5 वा. बेंगळूरला पोहोचेल. बेळगावसह खानापूर, लोंढा, अळणावर, धारवाड, हुबळी असे थांबे देण्यात आले आहेत. एकूण 16 डबे जोडण्यात आले असून यामध्ये 10 स्लीपर डबे आहेत. प्रवाशांनी रेल्वेसेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन नैर्त्रुत्य रेल्वेने केले आहे.









