चार एक्स्प्रेसची सोय, सणानिमित्त गावी येणाऱ्यांना दिलासा
प्रतिनिधी/ बेळगाव
दसरा व दिवाळीला अद्याप काही दिवस असले तरी नैर्त्रुत्य रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी या मार्गावर उत्सव स्पेशल रेल्वे सोडल्या जाणार असल्याचे जाहीर केले आहे. नैर्त्रुत्य रेल्वे विभागात एकूण 22 स्पेशल एक्स्प्रेस धावणार आहेत. यापैकी यशवंतपूर-बेळगाव व बेळगाव-यशवंतपूर या मार्गावरही एक्स्प्रेस धावणार आहेत.
दसरोत्सवासाठी 9 ऑक्टोबर रोजी यशवंतपूर-बेळगाव एक्स्प्रेस धावणार आहे. सायंकाळी 6.15 वा. बेंगळूरच्या यशवंतपूर रेल्वेस्थानकातून निघालेली एक्स्प्रेस दुसऱ्या दिवशी पहाटे 5 वाजता बेळगावला पोहोचेल. दि. 10 रोजी बेळगावहून सायंकाळी 5.30 वा. निघालेली एक्स्प्रेस दुसऱ्या दिवशी पहाटे 4.30 वा. यशवंतपूरला पोहोचेल. दि. 12 रोजी सायंकाळी 6.15 वा. यशवंतपूर येथून निघालेली एक्स्प्रेस दुसऱ्या दिवशी पहाटे 5 वा. बेळगावला पोहोचेल. तर दि. 13 रोजी बेळगावहून सायंकाळी 5.30 वा. निघालेली एक्स्प्रेस पहाटे 4.30 वा. यशवंतपूरला पोहोचेल.
दिवाळीसाठी बेळगावला चार रेल्वे
दिवाळीच्या काळात नैर्त्रुत्य रेल्वेने चार रेल्वेफेऱ्या उपलब्ध करून दिल्या आहेत. 30 ऑक्टोबर रोजी यशवंतपूर येथून सायंकाळी 7.30 वा. निघालेली एक्स्प्रेस दुसऱ्या दिवशी सकाळी 7.15 वा. बेळगावला पोहोचेल. दि. 31 रोजी बेळगावहून सायंकाळी 5.30 वा. निघालेली एक्स्प्रेस दुसऱ्या दिवशी पहाटे 4.30 वा. यशवंतपूरला पोहोचेल. दि. 1 नोव्हेंबर रोजी यशवंतपूर येथून सायंकाळी 7.30 वा. निघालेली एक्स्प्रेस दुसऱ्या दिवशी सकाळी 7.15 वा. बेळगावला पोहोचेल. दि. 3 रोजी बेळगावमधून सायंकाळी 5.30 वा. निघालेली एक्स्प्रेस दुसऱ्या दिवशी पहाटे 4.30 वा. यशवंतपूर येथे पोहोचेल.









