गणेश उत्सव साजरा करण्यासाठी बेंगळूरहून बेळगाव ला येणाऱ्या भाविकांची सोय व्हावी यासाठी नैऋत्य रेल्वे विभागाने यशवंतपूर- बेळगाव या मार्गावर विशेष रेल्वे सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. उत्सव स्पेशल रेल्वेची एक फेरी होणार आहे. यामुळे गणेशोत्सवासाठी गावी परतणाऱ्या भाविकांची सोय होणार आहे. मंगळवार दिनांक 30 ऑगस्ट रोजी रात्री 9.30 वाजता यशवंतपूर येथे रेल्वे स्थानकातून रेल्वे निघणार असून दुसऱ्या दिवशी सकाळी 8.25 वाजता बेळगावला पोहोचणार आहे. परतीच्या प्रवासात 4 सप्टेंबर रोजी रात्री 9.20 वाजता बेळगाव रेल्वे स्थानकातून निघालेली रेल्वे दुसऱ्या दिवशी सकाळी 8:20 वाजता यशवंतपूर रेल्वे स्थानकात पोहोचणार आहे. स्वातंत्र्य दिन, कृष्ण जन्माष्टमी यासाठी सुरू करण्यात आलेली उत्सव स्पेशल आता गणेशोत्सवासाठी धावणार असल्याने गणेशभक्तांची सोय होणार आहे. त्यामुळे समाधान व्यक्त होत आहे.
Previous Articleविरोधकांची दाणादाण, भाजपची जोरदार मुसंडी
Next Article कोल्हापुरात फडकला महाध्वज तिरंगा









