कोल्हापूर :
ख्रिसमसनिमित्त प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वेच्या वतीने साप्ताहिक विशेष गाड्यांचे नियोजन केले आहे. यामध्ये 25 डिसेंबर ते 8 जानेवारी 2025 दरम्यान, पुणे-करमाळी साप्ताहिक स्पेशल ट्रेन असणार आहे. दर बुधवारी पुण्याहून 5.10 वाजता निघेल आणि त्याच दिवशी 20.25 वाजता करमाळीला पोहोचणार आहे. तसेच दर बुधवारी करमाळी येथून 22.20 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 13.00 वाजता पुण्याला पोहोचणार आहे.
या रेल्वेचे चिंचवड, तळेगाव, लोणावळा, कल्याण, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड येथे थांबे असणार आहेत. 17 आसीएफ कोच, एक फर्स्ट एसी, एक एसी-2 टियर, दोन एसी-3 टियर, 5 स्लीपर क्लास आणि 2 गार्ड ब्रेक व्हॅनसह 8 जनरल सेकंड क्लास आहे. विशेष शुल्कावर बुकिंग 14 डिसेंबर 2024 पासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि रेल्वेच्या वेबसाईटवर सुरू होईल.








