कोल्हापूर / संतोष पाटील :
जिह्यातील सर्वच पोलीस ठाण्यांचे एकमेकाशी आणि स्थानिक अवैध व्यावसायिकांशी त्या अर्थाने घनिष्ठ संबंध निर्माण झाले आहेत. रोज सर्वसामान्यांना दिसणारे समाजविघातक कृत्य ठाणेदारानां दिसेना झाले आहे. पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांनी अवैध व्यावसायांची माहिती देणारी पोलीसांसह इतर स्वतंत्र अशी यंत्रणा अॅक्टिव्ह केली आहे. पोलीस ठाण्याची हद्द कोणाचीही असो एसपीचे तात्पूर्ते नेमलेलं खास पथक अवैध व्यवसायिकांच्या मुसक्या आवळणार आहे. याची खबरबात कारवाई झाल्यानंतरच संबंधित पोलीस ठाणे किंवा स्थानिक गुन्हे शाखेला होईल. एसपींच्या पथकाने करवीर तालुक्यातील निर्जनस्थळी असलेल्या जुगार अड्यावर धाड टाकून पहिली चुणूक दाखवली आहे.
कोल्हापुरात अवैध व्यवसायिक, खासगी सावकारी, गांजा विक्री, फाळकुट दादा, जुगार, मटका आदी समाजविघातक कृत्य यंत्रणेच्या नाकावर टिचून राजरोजपणे सुरू आहेत. शेकडो किलोत गांजा सापडतो मात्र पुडीने विक्री होणारा गांजा यंत्रणेला दिसत नाही. ऑनलाईन आणि चिट्टीने मटका बहरला आहे. दोन वर्षात मटका व्यवसायिक पहिल्या ऊबाबात वावरत आहेत. अनेक नव्या बुकींची यात भर पडली आहे. जुगार अड्डयावर पानांची पिसणी धुमधडाक्यात सुरू आहे. रोज कुठे ना कुठे फाळकुट दादा बेंडकुळ्या दाखवून भागात दहशत निर्माण करत आहे. घरफोड्या आणि भुरट्या चोरांनी नाकीनऊ आणले आहे. ओपनबार आणि गांजाचा धुर निघणारी ठिकाणं माहिती असूनही यंत्रणेची हाताची घडी आहे. हा सगळा प्रकार सर्वसामान्यांना दिसतोय. मात्र यंत्रणा पध्दतशीरपणे कानाडोळा करत आहे.
या पार्श्वभूमीवर योगेशकुमार गुप्ता यांनी जिल्हा पोलीस दलाची कमान हाती घेतली. शांत स्वभाव आणि सहज वावर यामुळे पोलीस यंत्रणा त्यांचा अंदाज घेत आहे. पहिल्या टप्प्यात मटका बंद म्हणजे बंदचे फर्मान एसपींनी दिले आहे. दोन वर्षात वरकमाईची सवय लागलेली यंत्रणा याकडे अजूनही सहजपणे घेत आहे. काळेंधंदे हफ्तेबाजी नाही म्हणजे नाही, हे एसपींनी निक्षून सांगूही यंत्रणा सावधपणे तोडपाणी करत आहे. मात्र आपण दिलेला आदेश, सुचना यांचे कोण किती पालन करत आहे. याचा योगेशकुमार गुप्ता हे अगदी शांतपणे अभ्यास करत आहेत. योगेशकुमार गुप्ता यांनी दरम्यानच्या काळात कोल्हापूर जिह्यात पोलीस आणि बाहेरील अशा व्यक्तींचे आपले स्वत:चे नेटवर्क तयार केले आहे. यामाध्यमातून जिह्यातील अवैध व्यवसायासह पोलीस दलातील कामचुकारांची माहिती संकलित केली जात आहे. पोलीस ठाण्यात सुरू असलेल्या अवैध व्यवसायिकांचा डाटा तयार कऊन संबंधित ठाणेदारांना दणका देण्याचे नियोजन सुरू आहे.
याचाच एक भाग म्हणून योगेशकुमार गुप्ता यांनी त्यावेळी प्रसंगानुऊप तात्पूर्ते परंतू गोपनीय विशेष पथक नेमायचे. त्या एका दिवसांच्या कारवाईपुरतेच त्या पथकाचे महत्व असेल. दुसर्या कारवाईवेळी दुसरे पथक असणार आहे. अशाच विशेष पथकाने संबधित पोलीस ठाणे अथवा एलसीबीला कोणतीही कल्पना न देता, करवीर तालुक्यातील पडवळवाडी येथे सुरू असलेल्या जुगार अड्यावर रविवारी मध्यरात्री धाड टाकली. एसपी पथक आणि कारवाईबाबत तोपर्यंत जिह्यातील पोलीस दलास कानोकानी खबर नव्हती. पथकाने कारवाई कऊन काम फत्ते कऊन एसपींना अहवाल सादर केल्यानंतर संबंधित पोलीस ठाण्याला कारवाईची माहिती समजली. अशा प्रकारे शहर आणि जिह्याभर कारवाई केली जाणार आहे.
एसपीच्या दणक्याने जिह्यातील ठाणेदार हडबडले आहेत. आता पुढचा नंबर कोणाचा ? कोणाच्या भागात कोणती कारवाई होणार ? याकारवाईनंतर ठाणेदारांची उलबांगडीही होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जूजबी परंतू प्रभावी संवाद ठेवत, प्रेमळपणे आदेश देणार्या पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांच्या कारवाईचा फंड्याने पोलीस दल हडबडून गेले आहे.
अनेक ठाणेदारांनी आपल्या कार्यक्षेत्रातील काळे धंदे बंद करण्याच्या सुचना दिल्या आहेत. तर काहींनी थोडे दिवस शांत बसा असा सावध पावित्रा घेतला आहे. एसपीचे विशेष पथकात कोण कोण आहेत, त्यांची पुढील कारवाई कोणती असेल ? याबाबत खुद्द एसपी यांच्याशिवाय कोणालाही कल्पना नाही. हे पथक कायमचे नेमणक केलेले नाही. दरवेळी वेगळे पथक असणार आहे. त्यामुळे आपल्य हद्दीत एसपीच्या पथकाने कारवाई केल्यास पुढे काय ? याची धास्ती ठाणेदारांना लागली आहे.
- संपर्क साधण्याचे अवाहन
पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांचे शांतपणे होणारे हे ऑपरेशन हप्तेबाजीत गुंतलेल्या यंत्रणेला घरचा रस्ता दाखवणारे ठऊ शकते. ही कारवाई निरंतन सुरू ठेवावी. चिरीमिरीत गुंतलेल्या यंत्रणेला शंभर टक्के वटणीवर येणार नसली तरी सकारात्मक बदल झाला तरी तो कोल्हापूरकरांच्या हिताचा ठरणार आहे. त्यामुळे आपल्या परिसरातील अवैध व्यवसायाबाबत थेट पोलीस अधीक्षकांशी संपर्क साधणे कोल्हापूरची बिघडलेली सामजिक स्थिती सुधारण्यास मदत ठऊ शकते.
- संपर्क साधा
आजूबाजूला घडणार्या कोणत्याही समाजविघातक कामाची माहिती देण्यासाठी कोल्हापूरकर कधीही मला भेटू शकतात. अशी माहिती देणार्यांचे नाव पूर्णपणे गुप्त ठेवले जाईल. लेखी अर्ज, फोन, वॉटस्अॅप तसेत मेल व्दारेही आलेल्या माहितीची दखल घेतली जाईल. माझे कार्यालय कोल्हापूकरांसाठी नेहमी सतर्क आणि तत्पर असेल.
– योगेशकुमार गुप्ता (पोलीस अधीक्षक)








