प्रतिनिधी /पणजी
गोव्याच्या 35 व्या घटकराज्य दिनाचा विशेष कार्यक्रम आज सोमवार 30 मे 2022 रोजी सकाळी 11 वा. दरबार हॉल, राजभवन, दोनापावला येथे आयोजित करण्यात आला आहे. राज्यपाल पी. एस श्रीधरन हे त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित रहातील. केंद्रीय पर्यटनमंत्री किशन रेड्डी व मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे खास निमंत्रित म्हणून हजर रहाणार आहेत. राज्य सरकारच्या माहिती प्रसिद्धी खात्यातर्फे हा कार्यक्रम आखण्यात आला आहे.









