नवी दिल्ली / वृत्तसंस्था
दिल्ली विमानतळाच्या टर्मिनल-1 जवळ रविवारी बांधकाम सुरू असताना काही भाग कोसळून एक अपघात झाला. या अपघातात दोन मजुरांचा मृत्यू झाला, तर सहा जण जखमी झाले. सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या अपघाताचे कारण समजू शकलेले नाही. पोलिसांनी या प्रकरणी एफआयआर नोंदवला आहे. विमानतळावरील एक नंबरच्या प्लॅटफॉर्मजवळ नवीन बांधकाम सुरू असताना ही दुर्घटना घडली आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.









