जिल्ह्यातील आमदार आज सकाळी मुंबईला रवाना
कोल्हापूर :
कोल्हापूर जिल्ह्यातील विजयी आमदारांना मुंबईत नेण्यासाठी आज सकाळी खास विमान पाठवण्यात आले . सर्व आमदार वेळेत व एकत्रित मुंबईत पोहोचावे म्हणून त्यांच्यासाठी ही खास विमानाची सोय करण्यात आली आहे.
या आमदारांना काल रात्रीच मुंबईत येण्याच्या सूचना होत्या. पण विजयाचा जल्लोष, कार्यकर्त्यांची अभिनंदनसाठी लागलेली रिघ यामुळे काल आमदाराना मुंबईकडे जाणे शक्य नसल्याचे स्पष्ट झाले त्यामुळे आज या विमानाची सोय करण्यात आली . दरम्यान, नूतन आमदारांनी मुंबईच्या जाण्याच्या दृष्टीने तयारी केली होती .
आज संध्याकाळी चार वाजता मुंबईत सर्व आमदारांची बैठक मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार आहे. यासाठीची विशेष जबाबदारी खासदार धनंजय महाडिक आणि धैर्यशील माने यांच्यावर सोपविण्यात आली आहे.








