39 दिवस चालणाऱ्या गणेश उत्सवतील श्री गणरायचे घेतले दर्शन
आचरा प्रतिनिधी
कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक श्री. संजय दराडे (आयपीएस) यांनी आज इनामदार श्रीदेव रामेश्वर मंदिरास भेट देत श्रीदेव रामेश्वर यांच्या दर्शनासह 39 दिवस चालणाऱ्या गणेश उत्सवातील श्री गणेश मूर्तीचे दर्शन घेऊन कोकणवासीयांच्या सुख-समृद्धी व आरोग्यपूर्ण जीवनासाठी प्रार्थना केली. गणरायाच्या चरणी त्यांनी कोकण प्रदेशातील शांतता, ऐक्य आणि कायदा-सुव्यवस्था अधिक मजबूत राहावी, अशी मनोकामना व्यक्त केली.गणेशोत्सव हा कोकणच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग असून दरवर्षी मोठ्या उत्साहात आणि श्रद्धेने साजरा केला जातो. सणाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन सुरक्षेची व्यापक तयारी करते नागरिकांनी उत्सव आनंदात, परस्परांमध्ये सौहार्द जपत आणि प्रशासनाला सहकार्य करून साजरा करावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले. या भेटीच्या वेळी आचरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदिप पोवार तसेच स्थानिक पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.









