प्रतिनिधी /बेळगाव
जागतिक नेत्रदान दिनानिमित्त जायंट्स प्राईड सहेलीतर्फे शर्मा स्विट्स येथे चार खास व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. येथील रमेश हे 100 टक्के नेत्रहिन आहेत. मात्र पदवी घेऊन ते श्रद्धा एजन्सीमध्ये काम करतात. राजू हे मिलन हॉटेलजवळील पेट्रोलपंपावर काम करतात. त्यांना 30 टक्के दिसते. ते हवा भरण्याचे काम करतात. या दोघांबरोबर मारुती हे 60 टक्के दिव्यांग असून ते शर्मा स्विट्समध्ये काम करतात. चंदू पण दिव्यांग असून येथेच काम करतात.
शर्मा स्विट्सचे मालक राजगोपाल शर्मा यांनी त्यांना काम दिले असून त्यांनी त्यांचा विश्वास सार्थ ठरविला आहे. जायंट्स प्राईड सहेलीच्या सदस्यांनी या चौघांचा सत्कार केला. अध्यक्षा आरती शहा यांनी सत्कार करताना त्यांचे अभिनंदन केले. यावेळी रश्मी पाटील, मोनाली शहा व पवन राजपुरोहित उपस्थित होते.









