वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय पुरुष हॉकी संघातील गोलरक्षकांसाठी हॉलंडचे गोलरक्षक प्रशिक्षक डेनिस व्हॅन डेल पोल यांनी दोन खास शिबिरे घेण्याचे ठरविले आहे. पहिले शिबिर 13 जुलैपासून घेण्यात येणार आहे. हे शिबिर 19 जुलैपर्यंत चालणार आहे.
हॉलंडचे गोलरक्षक प्रशिक्षक डेनिस हे पुन्हा 7 सप्टेंबर रोजी भारतात येणार आहेत. दरम्यान भारतीय गोलरक्षकासाठी दुसरे शिबिर 14 सप्टेंबरला घेतले जाणार आहे. आगामी होणाऱ्या हेंगझोयु आशियाई स्पर्धेसाठी भारतीय हॉकी संघाला पूर्वतयारी करता हॉकी इंडियाने हे खास शिबिर आयोजित केले आहे. या शिबिरात भारतीय गोलरक्षक पी. आर. श्रीजेस, कृष्णन पाटक, सुरज करकेरा, प्रशांतकुमार चौहान, पवन मलिक यांचा सहभाग राहिल.









