यात्रा काळात धावणार जादा बस
प्रतिनिधी/ बेळगाव
यात्रा-जत्रांना प्रारंभ होत आहे. याकरिता परिवहनने यात्रा-जत्रांसाठी विशेष बस सज्ज केल्या आहेत. मोदगा भावकेश्वरी यात्रा, रायबाग मायाक्का चिंचली, अंकली सिद्धेश्वर यात्रा तोंडावर आल्या आहेत. यात्रा काळात प्रवाशांची ये-जा अधिक असते. यासाठी परिवहन यात्रा काळात जादा बस सोडणार आहे. दोन वर्षांच्या कोरोनानंतर यात्रा-जत्रा पूर्ववतपणे सुरू झाल्या आहेत. त्यामुळे परिवहनने यात्रा विशेष बस सज्ज केली आहे.
उळवी, मोहनगा द•ाr, मायाक्का चिंचली, मलप्रभा खानापूर आदी यात्रांतून परिवहनला समाधानकारक महसूल प्राप्त होतो. त्यामुळे या यात्रांसाठी जादा बस पुरविल्या जाणार आहेत. कोरोना काळात परिवहनला मोठा फटका बसला होता. त्यामुळे परिवहन आर्थिकदृष्ट्या अडचणीत सापडले आहे. अशा परिस्थितीत विविध ठिकाणी बस सोडून उत्पन्न वाढविण्यासाठी परिवहनचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, विविध ठिकाणांच्या यात्रा-जत्रा तोंडावर आल्या आहेत. या यात्रा-जत्रांसाठी परिवहन अतिरिक्त बस सोडणार आहे. यासाठी बसची तजवीज करण्यात आली आहे.
महाशिवरात्रीसाठी खानापूर तालुक्यातील माऊली आणि मलप्रभा नदीतीरावर यात्रा भरते. यासाठी परिवहन जादा बस सोडणार आहे. एकूणच विविध ठिकाणी होणाऱ्या यात्रांसाठी जादा बस सोडण्याचे नियोजन परिवहनने केले आहे. त्यामुळे यंदाच्या यात्रा-जत्रांतून परिवहनला समाधानकारक उत्पन्नाची अपेक्षा आहे. दरवर्षी यात्रा-जत्रांतून 30 लाखांपर्यंत अतिरिक्त महसूल प्राप्त होतो. मागील दोन वर्षात मात्र या महसुलापासून परिवहनला दूर राहावे लागले आहे. मात्र यंदा पूर्ववत यात्रा-जत्रा सुरू झाल्या आहेत. त्यामुळे भाविकांची संख्या वाढली आहे. त्यामुळे यात्रा काळात विविध ठिकाणी जादा बस सोडल्या जाणार आहेत.
के. के. लमाणी (विभागीय संचार अधिकारी)
येत्या काळात होणाऱ्या यात्रांसाठी बसचे नियोजन करण्यात आले आहे. यात्रा काळात अतिरिक्त बससेवेची व्यवस्था केली जाणार आहे. प्रवाशांच्या संख्येनुसार जादा बसफेऱ्या सोडल्या जाणार आहेत. यात्रेसाठी विशेष बस सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.









