दिवाळीत अभ्यंगस्नान करताना सुगंधी तेल आणि उटणे लावण्याची परंपरा कायम आहे. दरवर्षी हे उटणे पाण्यात भिजवून नरक चतुर्दशीच्या अभ्यंगस्नापूर्वी अंगाला लावतात.पण फक्त दिवाळीतच नव्हे तर हे नियमित उटणे लावल्यास तुमची त्वचा अधिक मुलायम आणि ताजीतवानी राहू शकते.उटणं हे एक उत्तमप्रकारचे स्क्रबर आहे.ज्याचे अनेक उपयुक्त फायदे आहेत.
उटण्याचे फायदे
उटणे हा एक नैसर्गिक फेसमास्क आहे. उटणे नियमित स्वरूपात लावल्यास, तुमची त्वचा अधिक ताजीतवानी आणि मऊ मुलायम राहते. उटण्यामध्ये वापरले जाणारे बेसन हे त्वचेवरील डेड स्किन घालवून तुम्हाला उत्तम त्वचा मिळवून देण्यास अधिक लाभदायक ठरते. त्याचसोबत त्वचेवरील अधिक तेल निघून जाण्यास मदत होते.
चेहऱ्यावर सुरकुत्या येणे, मुरूमं येणे आणि त्याचे डाग राहणे अथवा प्रदूषणामुळे चेहऱ्यावर काळपटपणा येणे या समस्या अनेकांना भेडसावतात.पण उटण्याचा वापराने या समस्या दूर धुवू शकतात. तुम्ही जर सतत उन्हात काम करत असाल तर डागविरहीत त्वचेसाठी उटणे हा उत्तम उपाय आहे.
शरीरावरील नको असलेले केस काढून टाकण्यासाठी उटणे उपयुक्त ठरते. पूर्वीच्या काळी नवजात बाळांच्या शरीरावरील केस काढण्यासाठीही उटण्याचा वापर करण्यात येत होता.
उटण्याने त्वचा मुलायम तर होतेच शिवाय मुरूमांना रोखण्याचे कामही उटणे करते. हळद आणि चंदनामध्ये अँटिबॅक्टेरियल आणि अँटिफंगल गुण आढळतात. त्यामुळे त्वचेवरील मुरुमांवर उटणे हा उत्तम पर्याय आहे.
उटणं लावल्याने त्वचा तेजस्वी राहते. उटण्यामध्ये अॅन्टी एजिंग, अॅन्टी ऑक्सिडेटीव्ह आणि दाहशामक क्षमता असते.यामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यास मदत होते.
जर त्वचा काळवंडली असेल तर त्यावर उटणं हे एका स्क्रबरप्रमाणे काम करते.यामुळे त्वचा उजळण्यास मदत होते.तसेच त्वचेवर साचलेला डेड स्किनचा स्तर कमी करण्यास मदत करते.
Previous Articleसोशल मीडियावर सिनेट निवडणूक प्रचार यंत्रणा सज्ज
Next Article आरोग्य विभागातील कामचुकारांचे धाबे दणाणले









