वारणानगर / प्रतिनिधी
जोतिबा श्रावण षष्टी यात्रेतील आणि गणेशोत्सवातील उत्कृष्ट सेवेसाठी कोडोली पोलीसांना विशेष पुरस्काराचा सन्मान देण्यात आला. जिल्हा पोलीस प्रमुख महेंद्र पंडित यांच्याकडून देणेत आलेला पोलीस निरीक्षक शितलकुमार डोईजड यांनी स्विकारला.
वाडी रत्नागिरी ता. पन्हाळा येथील दख्खनच्या राजा महाराष्ट्राचे लोकदैवत श्री जोतिबा देवाची श्रावणात महिनाभर भाविकांची गर्दी असते,याच महिन्यात श्रावण षष्टी यात्रा,तिसऱ्या सोमवारी १२ जोतिर्लिंगाच्या दर्शनासाठी नगर दिंडी प्रदक्षिणा आसते यासाठी लाखो भाविक येत असतात.
कोडोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत २६ गावे व इतर वाड्या आहेत यातून सुमारे ४०० तरुण मंडळे श्री गणेशोत्सव साजरा करतात यातील कोडोली शहरात १५० च्या वर मंडळे उत्सव साजरा करतात “श्री “चे आगमन,स्थापना, विसर्जन मिरवणूक शांततेत पार पडली. यात्रा काळात श्री जोतिबा मंदिर व परिसरात तसेच गणेशोत्सवात सर्व गावात चोख बंदोबस्ताचे योग्य नियोजन करून यात्रा उत्सव सुरक्षित शांततेत कोडोली पोलीस ठाण्याचे सर्व अधिकारी कर्मचारी यानी पार पाडल्या बद्दल कोडोली पोलीस दलाचा जिल्ह्याच्या मासिक आढावा बैठकीत पोलीस प्रमुख महेंद्र पंडित यांनी विशेष पुरस्काराने सन्मान केला.
पोलीस प्रमुखासह अतिरिक्त पोलीस प्रमुख,शाहूवाडी उपविभागाचे पोलीस उपअधिक्षक जयकुमार सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनामुळे कोडोली पोलीसांना हे यश मिळाले असून फौजदार नरेंद्र पाटील,मनोज कदम, नामदेव दांडगे,सहा.फौजदार, हावलदार, पोलीस नाईक,पोलीस कॉन्स्टेबल यांच्या परिश्रमामुळे हा विशेष पुरस्कारचा सन्मान मिळाल्याचे सहा. पोलीस निरीक्षक शितलकुमार डोईजड यानी सांगितले.









