पिंपरी / प्रतिनिधी :
सत्तासंघर्षाच्या निकालावर 16 आमदार पात्र की अपात्र यावर विधानसभेच्या अध्यक्षांना रिझनेबल टाईममध्ये निर्णय घ्या, असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे. अध्यक्षांना रिझनेबल टाईम समजतो, त्यामुळे रिझनेबल टाईममध्ये ते योग्य तो निर्णय घेतील, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
फडणवीस म्हणाले, 16 अपात्र आमदारांच्या बाबतीत विधानसभा अध्यक्षांना घेराव घालू, त्यांना चालू देणार नाही, अशी भाषा उद्धव ठाकरेंकडून केली जात आहे. ही भाषा लोकशाहीत बसणारी आहे का? याचा विचार त्यांनी करावा. आपली बाजू कमकुवत असेल तर अशा प्रकारची विधाने होत असतात. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे निष्णात वकील आहेत. त्यांना कायदा चांगला समजतो. अनेक वर्ष त्यांनी प्रॅक्टिस केली आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने रिझनेबल टाईममध्ये 16 अपात्र आमदारांच्या बाबत निर्णय घ्यावा असे म्हटले आहे. त्यामुळे अध्यक्ष रिझनेबल टाईम मध्ये योग्य तो निर्णय देतील. राहुल नार्वेकर कोणतीही बेकायदेशीर काम करणार नाही, कोणी कितीही दबाव आणला तरी ते कायद्याच्या चौकटीत राहूनच निर्णय देतील असे देखील फडणवीस म्हणाले.








