वृत्तसंस्था / गुरुग्राम (हरियाणा)
डीपी विश्व गोल्फ टूरवरील येथे झालेल्या 2025 च्या इंडियन खुल्या गोल्फ स्पर्धेचे अजिंक्यपद स्पेनच्या युगेनियो चकाराने पटकाविले. इंडियन खुली गोल्फ स्पर्धा जिंकणारा चकारा हा स्पेनचा पहिला गोल्फपटू आहे.
या स्पर्धेमध्ये पहिल्या चार दिवसांच्या कालावधीत चकाराने आपली आघाडी कायम राखली होती. सोमवारी त्याने शेवटच्या फेरीमध्ये 70-70-73-71 असे एकूण 4-अंडर 284 सरासरी गुण नोंदवित विजेतेपद पटकाविले. स्पेनच्या चकाराने या स्पर्धेतील विद्यमान विजेता जपानचा नाकाजिमाला मागे टाकले. या स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभात पवन मुंजाळ यांच्या हस्ते चकाराला आकर्षक चषक आणि 382,500 अमेरिकन डॉलर्सचे बक्षीस देण्यात आले. उपविजेत्या जपानच्या नाकाजिमाला 247500 अमेरिकन डॉलर्सचे बक्षीस मिळाले.









