वृत्तसंस्था/ क्लेव्हलँड
डब्ल्यूटीए टूरवरील शनिवारी येथे झालेल्या क्लेव्हलँड महिलांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत स्पेनच्या सारा सोरीबेसने टोर्मो एकेरीचे जेतेपद मिळवताना रशियाच्या अॅलेक्झांड्रोव्हाचा पराभव केला.
शनिवारी या स्पर्धेतील झालेल्या सामन्यात महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात 95 व्या मानांकित सारा सोरीबेस टोर्मोने अॅलेक्झांड्रोव्हाचा 3-6, 6-4, 6-4 अशा सेट्समध्ये पराभव केला. टोर्मोच्या वैयक्तिक टेनिस कारकीर्दीतील हे दुसरे विजेतेपद आहे. हा अंतिम सामना अडीच तास चालला होता.









