वृत्तसंस्था / माँट्रियल (कॅनडा)
येथे सुरु असलेल्या एटीपी टूरवरील कॅनडा खुल्या पुरुषांच्या टेनिस स्पर्धेत स्पेनचा टॉप सिडेड कार्लोस अल्कॅरेझने एकेरीची उपांत्यपूर्व फेरी गाठताना हुरकेझचा पराभव केला.
शुक्रवारी झालेल्या पुरुष एकेरीच्या सामन्यात अलकॅरेझने 15 व्या मानांकित हुबर्ट हुरकेझचे आव्हान 3-6, 7-6(7-2), 7-6(7-3) असा पराभव करत आपली विजयी घोडदौड कायम राखली आहे. अलकॅरेझने यापूर्वी सलग 14 सामने जिंकले आहेत. आता अलकॅरेझचा पुढील सामना टॉमी पॉलशी होणार आहे. टॉमी पॉलने मार्कोस गिरॉनचा 6-3, 6-2 असा पाडत उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे.
या स्पर्धेतून ब्रिटनचा अँडी मरे, फ्रान्सचा मोनफिल्स आणि रशियाचा आंद्रे रुबलेव यांनी माघार घेतली आहे. ब्रिटनच्या मरेने या स्पर्धेत आपले पहिले दोन सामने जिंकले. त्यानंतर प्रकृती नादुरुस्तीमुळे त्याने स्पर्धेतून माघार घेतली आहे. मरेचा पुढील सामना जेनिक सिनेरशी होणार होता. मरेच्या माघारीमुळे सिनेरला पुढील फेरीत चाल मिळाली आहे. त्याचप्रमाणे या स्पर्धेतून रशियाचा आंद्रे रुबलेव आणि फ्रान्सचा गेल मोनफिल्स यांनीही तंदुरुस्तीच्या समस्येवरून माघार घेतली आहे.









