वृत्तसंस्था/ रोटरडॅम
एटीपी टूरवरील येथे सुरु असलेल्या रोटरडॅम खुल्या पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत स्पेनच्या माजी टॉप सिडेड कार्लोस अल्कारेझने एकेरीची अंतिम फेरी गाठताना हुरकेझचा पराभव केला.
या स्पर्धेतील उपांत्य फेरीच्या सामन्यात अल्कारेझने हुरकेझचे आव्हान 6-4, 6-7 (5-7), 6-3 असे संपुष्टात आणले. हा उपांत्य सामना तब्बल अडीच तास चालला होता. आता अल्कारेझ आणि ऑस्ट्रेलियाचा डी. मिनॉर यांच्यात जेतेपदासाठी लढत होईल. दुसऱ्या उपांत्य लढतीत डी मिनॉरने इटलीच्या बेलुसीचा 6-1, 6-2 असा फडशा पाडला. इनडोअर टेनिस स्पर्धेतील पहिले जेतेपद मिळविण्यासाठी अल्कारेझला आणखी एका विजयाची गरज आहे.









