वृत्तसंस्था / रोटरडॅम
एटीपी टूरवरील येथे झालेल्या रोटरडॅम खुल्या इनडोअर पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत स्पेनच्या कार्लोस अल्कारेझने एकेरीचे जेतेपद पटकाविताना अंतिम सामना ऑस्ट्रेलियाच्या अॅलेक्स डी मिनॉरचा पराभव केला.
रोटरडॅम टेनिस स्पर्धेच्या गेल्या 52 वर्षांच्या इतिहासात अल्कारेझ हा जेतेपद मिळविणारा स्पेनचा हा पहिला टेनिसपटू आहे. रविवारी झालेल्या एकेरीच्या अंतिम सामन्यात अल्कारेझने मिनॉरचा 6-4, 3-6, 6-2 असा पराभव केला. अल्कारेझचे इनडोअर टेनिस स्पर्धेतील हे पहिले जेतेपद आहे. गेल्या वर्षी या स्पर्धेत इटलीच्या सिनेरने जेतेपद मिळविताना ऑस्ट्रेलियाच्या अॅलेक्स डी मिनॉरचा अंतिम सामन्यात पराभव केला होता.









