वृत्तसंस्था/ ड्युसेलडॉर्फ (जर्मनी)
स्पेनने आपला जवळजवळ संपूर्ण संघ बदलूनही युरोपियन चॅम्पियनशिपमध्ये आपली विजयी वाटचाल कायम ठेवली असून अल्बानियावर त्यांनी 1-0 असा विजय मिळवला. अल्बानियाचा संघ स्पर्धेतून बाहेर पडला आहे.
संघाने आधीच ‘ब’ गटातील सर्वोच्च स्थान निश्चित केलेले असल्याने प्रशिक्षक लुईस दे ला फुएन्टे यांनी आपल्या 10 खेळाडूंमध्ये बदल करणे पसंत केले. 2008 नंतर प्रथमच युरोमधील सर्व तीन गट गेम त्यानी जिंकले आहेत. 2008 मध्ये त्यांनी ही स्पर्धा जिंकली होती. 13 व्या मिनिटाला फेरान टोरेसने केलेला गोल आणि गोलरक्षक डेव्हिड रायाने अरमांडो ब्रोजाचा स्टॉपेज टाइममध्ये उधळवून लावलेला गोल करण्याचा प्रयत्न यांच्या जोरावर स्पेनने एकही गोल न स्वीकारता गट फेरी पूर्ण केली. डॅनी ओल्मोचा फटका गोलपोस्टला आदळून परत आल्यानंतर त्यावर टोरेसने हा गोल नोंदविला.
अल्बानियाला प्रथमच बाद फेरीसाठी पात्र ठरण्याची कोणतीही आशा बाळगण्यासाठी किमान एक बरोबरी आवश्यक होती. प्रथमच तिसरे स्थान मिळविणेही त्यांच्यासाठी दिलासादायक ठरले असते. पण या सामन्यात पराभव स्वीकारावा लागल्याने त्यांच्या वाट्याला तळाकडचे स्थान आले आहे.
स्पेनला पराभूत करण्यात अल्बानियाचे अपयश म्हणजे इंग्लंड, फ्रान्स आणि नेदरलँड्स हे सर्व त्यांच्या शेवटच्या गट सामन्यांमध्ये काहीही घडले, तरी बाद फेरीसाठी पात्र ठरण्याची खात्री आहे. या सर्व संघांचे दोन सामन्यांतून चार गुण झाले आहेत आणि किमान तिसऱ्या क्रमांकावरील सर्वोत्तम संघांपैकी एक म्हणून ते पात्र ठरतील. स्पेनने जरी विजय मिळविलेला असला, मागील सामन्यात इटलीवर त्याच फरकाने मिळविलेल्या विजयापेक्षा हा 1-0 असा विजय कमी समाधानकारक राहिला.









