वृत्तसंस्था/ आझमगड
समाजवादी पक्षाचे बाहुबली आमदार रमाकांत यादव यांची न्यायालयाने तुरुंगात रवानगी गेली आहे. न्यायालयाच्या वॉरंटवर हजर झालेल्या रमाकांत यादव यांना 2016 मध्ये नोंद एका गुन्हय़ाप्रकरणी तुरुंगात जावे लागले आहे. बाहुबली रमाकांत यादव यांची गणना पूर्वांचलमधील मातब्बर नेत्यांमध्ये होते. फूलपूर विधानसभा मतदारसंघात ते चारवेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. तसेच आझमगडचे ते 4 वेळा खासदार राहिले आहेत. 2019 मध्ये भाजपकडून उमेदवारी न मिळाल्याने यादव यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. काही काळापूर्वी त्यांनी समाजवादी पक्षाचा झेंडा हाती घेतला होता. रमाकांत यादव हे वादग्रस्त वक्तव्यांसाठी अनेकदा चर्चेत राहिले आहेत.









