ऑनलाईन टीम / तरुण भारत :
2019 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल आक्षेपार्ह टिपण्णी आणि भडखाऊ भाषण केल्याप्रकरणी समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांना रामपूरच्या एमपी-एमएलए न्यायालयाने दोषी ठरवले आहे. त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
निवडणुकीदरम्यानची भडखाऊ भाषणं आणि मोदी, योगी यांच्याविरोधात आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचा आझम खान यांच्यावर आरोप होता. या प्रकरणी तत्कालीन व्हिडिओ सर्व्हिलन्स टीमचे प्रभारी (एसडीओ) अनिल कुमार चौहान यांनी एफआयआर दाखल केला होती. या प्रकरणात दोषी आढळल्याने आझम खान यांची आमदारकी रद्द झाली होती. सध्या ते जामिनावर बाहेर होते. रामपूरच्या न्यायालयाने आज आझम खान यांना दोषी ठरवत दोन वर्षांची शिक्षा ठोठावली आहे.
आझम खान यांच्यावर 171 जी आणि कलम 505 (1) बी आणि लोकप्रतिनिधी कायद्याच्या कलम 125 अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, शुक्रवारीच आझम खान यांची वाय श्रेणी सुरक्षा यूपी सरकारने काढून घेतली होती. सुरक्षा काढून घेतल्यानंतर आता आझम खान यांच्या निवासस्थानी तैनात असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनाही हटवण्यात आले आहे.









