वृत्तसंस्था / कीव्ह
दक्षिण कोरिया देशाचे यून सुक येओल यांनी शनिवारी अचानकपणे युक्रेनचा दौरा केला आहे. त्यांनी युक्रेनच्या नेत्यांची भेट घेऊन त्यांना रशियाविरुद्धच्या युद्धात समर्थन घोषित केले. त्यांनी या छोट्या दौऱ्यात त्यांच्या पत्नी किम किओन ही यांनाही सोबत नेले होते. यून यांनी युक्रेनच्या बुचा आणि इर्पिन या भागांना भेट दिली. या जुळ्या शहरांमध्ये रशियाच्या हल्ल्यानंतर अनेक मानवी मृतदेह आढळून आले होते. त्यामुळे जगभरात खळबळ उडाली होती. त्यांनी या युद्धात मृत्युमुखी पडलेल्या नागरीकांच्या स्मारकावर पुष्पचक्र अर्पण केले. दक्षिण कोरियाने अद्याप युक्रेनला शस्त्रपुरवठा केलेला नाही. मात्र, आर्थिक साहाय्य केले आहे.









