सवलतीच्या दरात करता येणार प्रवास
बेळगाव : कर्नाटक सरकार व भारतीय रेल्वेच्या संयुक्त विद्यमाने कर्नाटक भारत गौरव यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. एकूण दोन यात्रा यावेळी आयोजित करण्यात आल्या आहेत. रामेश्वर-कन्याकुमारी-मधुराई तिरुवअनंतपुरम अशी सहा दिवसांची यात्रा असणार आहे. तर जगन्नाथ पुरी दर्शन यात्रा ही आठ दिवसांची असणार आहे. दक्षिण भारत यात्रेसाठी 25 हजार रुपये प्रति व्यक्तीला खर्च होणार असून, त्यापैकी 10 हजार रुपये कर्नाटक सरकारकडून दिले जाणार असून, 5 हजार रुपये अनुदान दिले जाणार आहे. त्यामुळे प्रवाशाला प्रत्यक्षरित्या केवळ 10 हजार रुपये भरावे लागणार आहेत. तसेच जगन्नाथ पुरी या प्रवासासाठी 32 हजार खर्च येणार असून, त्यापैकी 17,500 रुपये कर्नाटक राज्य सरकार देणार असून 7500 रुपयांचे अनुदान यामुळे यात्रेकरूंना बुकींगसाठी 15 हजार रुपये भरावे लागणार आहेत. हा प्रवास करू इच्छिणाऱ्या प्रवाशांना बेळगाव तसेच हुबळी रेल्वे स्थानकातून प्रवास करता येणार आहे. दक्षिण भारत यात्रेसाठी 14 फेब्रुवारी रोजी निघणार असून 19 रोजी पुन्हा दाखल होणार आहेत. तर जगन्नाथ पुरी यात्रेसाठी 28 फेब्रुवारी रोजी निघणार असून 7 मार्चला पुन्हा कर्नाटकात दाखल होणार आहेत. अधिक माहितीसाठी प्रवाशांनी आयआरसीटीसीच्या वेबसाईटवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.









