वृत्तसंस्था/ पाँडेचेरी
2023 च्या क्रिकेट हंगामातील सुरू असलेल्या देवधर करंडक वनडे क्रिकेट स्पर्धेत पहिल्या दिवशी झालेल्या विविध सामन्यात दक्षिण विभागाने उत्तर विभागाचा पराभव केला.
प्रथम फलंदाजी करताना दक्षिण विभागाने 50 षटकात 8 बाद 303 धावा जमवल्या. रोहन कुनुमल आणि कर्णधार मयांक अगरवाल यांनी सलामीच्या गड्यासाठी 117 धावांची भागीदारी केली. कुनुमलने 3 षटकार आणि 8 चौकारांसह 61 चेंडूत 70 तर कर्णधार अगरवालने 68 चेंडूत 7 चौकारांसह 64 धावा जमवल्या. त्यानंतर नारायण जगदीशनने 3 षटकार आणि 4 चौकारांसह 66 चेंडूत 72, रिकी भुईने 31, अरुण कार्तिकने 21 धावा जमवल्या. उत्तर विभागातर्फे ऋषी धवन आणि मयांक मार्कंडे यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना उत्तर विभागाचा डाव 23 षटकात 60 धावात आटोपला. विद्वथ कविरप्पाने 17 धावात 5 तर विशाखने 2 गडी बाद केले.









