झिम्बाब्वेचा 5 गड्यांनी पराभव, ब्रेव्हीस ‘सामनावीर’
वृत्तसंस्था / हरारे
तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत द. आफ्रिकेने विजयी सलामी देताना सोमवारी झालेल्या पहिल्या सामन्यात यजमान झिम्बाब्वेचा 25 चेंडू बाकी ठेवून 5 गड्यांनी पराभव केला. द. आफ्रिकेच्या ब्रेव्हीसला ‘सामनावीर’ म्हणून घोषित करण्यात आले.
या सामन्यात द. आफ्रिकेने नाणेफेक जिंकून झिब्माब्वेला प्रथम फलंदाजी दिली. झिम्बाब्वेने 20 षटकात 6 बाद 141 धावा जमविल्या. त्यानंतर द. आफ्रिकेने 15.5 षटकात 5 बाद 142 धावा जमवित विजय नोंदविला.
झिम्बाब्वेच्या डावात कर्णधार सिकंदर रझाने 38 चेंडूत 2 षटकार आणि 3 चौकारांसह 54, बेनेटने 28 चेंडूत 4 चौकारांसह 30, ब्युरेलने 20 चेंडूत 1 षटकार आणि 3 चौकारांसह 29 धावा जमविल्या. झिम्बाब्वेच्या डावात 3 षटकार आणि 11 चौकार नोंदविले गेले. झिम्बाब्वेने पॉवरप्ले दरम्यान 6 षटकात 1 गडी गमविताना 34 धावा जमविल्या. सिकंदर रझाने 34 चेंडूत 2 षटकार आणि 3 चौकारांसह अर्धशतक पूर्ण केले. द. आफ्रिकेतर्फे लिनेडीने 16 धावांत 3 तर एन्गिडी, बर्जर आणि पीटर यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल क्खेळताना द. आफ्रिकेच्या डावात ब्रेव्हीसने 17 चेंडूत 5 षटकार आणि 1 चौकारासह 41 तर हर्मनने 37 चेंडूत 1 षटकार आणि 5 चौकारांसह 45, कर्णधार ड्युसेनने 13 चेंडूत 2 षटकार आणि 1 चौकारांसह 16, बॉश्चने 15 चेंडूत 3 चौकारांसह 23 आणि हेन्ड्रीक्सने 9 चेंडूत 2 चौकारांसह 11 धावा केल्या. द. आफ्रिकेने पॉवरप्ले दरम्यान 6 षटकात 3 गडी गमविताना 38 धावा जमविल्या. द. आफ्रिकेच्या डावात 8 षटकार आणि 12 चौकार नोंदविले गेले. झिम्बाब्वेतर्फे निगरेव्हाने 3 तर वेंदूने 2 गडी बाद केले. ब्रेव्हीस आणि हर्मन यांनी चौथ्या गड्यासाठी 62 धावांची भागिदारी केली.
संक्षिप्त धावफलक: झिम्बाब्वे 20 षटकात 6 बाद 141 (सिकंदर रझा 54, ब्युरेल 29, बेनेट 30, लिंडे 3-16), द. आफ्रिका 15.5 षटकात 5 बाद 142 (ग्रिव्हेस 41, हर्मन 45, बॉश्च नाबाद 23, निगरेव्हा 3-35, वेंदू 2-15)









