यजमान संघाने पहिल्या कसोटीत टीम इंडियाविरुद्ध दणदणीत विजय मिळवला. यानंतर मात्र यजमान संघासाठी वाईट बातमी समोर येत आहे. कर्णधार टेम्बा बवुमा धोंडशिरेच्या दुखापतीमुळे केपटाऊन कसोटीतून बाहेर पडला आहे. याच दुखापतीमुळे बावुमा बॉक्सिंग डे कसोटीदरम्यानही जास्त वेळ मैदानातून बाहेर होता. विशेष म्हणजे, बवुमाच्या जागी बदली खेळाडू म्हणून जुबेर हामजा याला संघात सामील केले गेले आहे. बवुमा सध्या रुग्णालयात असून त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. सध्या तरी डॉक्टरांनी त्याला विश्रांतीला सल्ला दिला असून पुढील वर्षाच्या सुरुवातीला न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिकेत तो खेळू शकणार नसल्याचे आफ्रिकन संघ व्यवस्थापनाने स्पष्ट केले आहे. दरम्यान, बवुमाच्या अनुपस्थितीत डीन एल्गारकडे शेवटच्या कसोटीसाठी आफ्रिकन संघाचे नेतृत्व असणार आहे.









