क्रीडा वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दक्षिण आफ्रिका 3 जूनपासून इंग्लंडमधील ससेक्स येथील अरुंडेल कॅसल क्रिकेट ग्राउंडवर चार दिवसाच्या सराव सामन्यात झिम्बाब्वेविरुद्ध खेळणार आहे. 11 जूनपासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध ओव्हल येथे होणाऱ्या त्यांच्या महत्त्वाच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलपूर्वी दक्षिण आफ्रिकेसाठी ही महत्त्वाची तयारी असेल.
दक्षिण आफ्रिकेने शेवटचा कसोटी सामना जानेवारी 2025 मध्ये पाकिस्तानविरुद्ध 2-0 ने मायदेशातील मालिकेत जिंकला होता. त्यांच्या शेजाऱ्यांविरुद्धच्या सराव सामन्यामुळे त्यांना डब्ल्यूटीसी फायनलपूर्वी रेड-बॉल क्रिकेटशी जुळवून घेण्याची संधी मिळेल. दरम्यान, ट्रेंट ब्रिज येथे इंग्लडविरुद्ध झालेल्या एकमेव कसोटीत इंग्लंडने एक डाव आणि 45 धावांनी विजय मिळविला. दोन दशकानंतर इंग्लिश भूमीवरील झिम्बाब्वेची ही पहिली कसोटी होती, जो त्यांच्या क्रिकेट प्रवासातील एक महत्त्वाचा क्षण आहे. झिम्बाब्वेकडे या सामन्यातून लक्षात ठेवण्यासारखे बरेच क्षण होते, विशेषत: पहिल्या डावात ब्रायन बेनेटचे लढाऊ शतक. झिम्बाब्वेला आगामी सामन्यात सिकंदर रझा, ब्लेसिंग मुझाराबानी आणि रिचर्ड नगारावा यांच्याशिवाय खेळावे लागणार आहे. परंतु शॉन विल्यम्स, बेनेट, व्हिक्टर न्याउची, क्लाईव्ह मदांडे आणि क्रेग एर्विन यांच्यासारख्या खेळाडूंसह एक मजबूत संघ उतरवण्याची अपेक्षा आहे. 2025 च्या विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी दक्षिण आफ्रिका संघ- टोनी डी झोर्झी, रायन रिकेल्टन, एडेन मार्करम, टेम्बा बवुमा (कर्णधार), डेव्हिड बेडिंगहॅम, ट्रिस्टन स्टब्स, काइल व्हेरेन, वियान मुल्डर, मार्को जॅन्सेन, कॉर्बिन बॉश, कागिसो रबाडा, लुंगी एनगिडी, डेन पॅटरसन, केशव महाराज, सेनुरन मुथुसामी.
झिम्बाब्वे संघ- व्रेग एर्विन (क), ब्रायन बेनेट, तनाका शिवांगा, बेन करन,
अॅलेक्स फालाओ, क्लाइव्ह मदांडे, वेस्ली माधेवरे, तनुनुरवा माकोनी, वेलिंग्टन मसाकाझा, व्हिन्सेंट मासेकेसा, न्यूमन न्यामहुरी, व्हिक्टर न्याउची, तफाडस्वा, विल्यम सेन्चो, निकोलस वेल्च, सीन विल्यम्स.









