वृत्तसंस्था/केपटाऊन
ऑगस्ट महिन्यात द. आफ्रिकेचा संघ विंडीजच्या दौऱ्यावर जाणार असून या दौऱ्यात उभय संघात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळविली जाणार आहे. या मालिकेसाठी क्रिकेट दक्षिण आफ्रिकेने सोमवारी 16 जणांचा संघ जाहीर केला असून मार्को जेनसेनला विश्रांती देण्यात आली आहे. उभय संघातील पहिली कसोटी 7 ऑगस्टला त्रिनीदाद-टोबॅगो येथे होणार आहे. या कसोटी मालिकेसाठी द. आफ्रिका संघामध्ये मॅथ्यु ब्रिझेक या नव्या चेहऱ्याला संधी देण्यात आली आहे. द. आफ्रिकेच्या डीन एल्गारने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती पत्करल्यानंतर आता द. आफ्रिकेची निवड समिती अनुभवी चेहऱ्याचा शोध घेत आहे. बहुमा, बेडींगहॅम, बर्गर, कोझी, केशव महाराज, माक्रेम, मुल्डेर, एन्गिडी, पॅटर्सन, रबाडा हे या संघातील अनुभवी खेळाडू आहेत.









