बॉश्चचे नाबाद अर्धशतक, द. आफ्रिकेला 90 धावांची आघाडी
वृत्तसंस्था / सेंच्युरियन
येथे सुरू असलेल्या पहिल्या क्रिकेट कसोटीत शुक्रवारी खेळाच्या दुसऱ्या दिवसाअखेर यजमान द. आफ्रिकेने आपले वर्चस्व राखले आहे. द. आफ्रिकेने पहिल्या डावात पाकवर 90 धावांची आघाडी घेतल्यानंतर पाकने दुसऱ्या डावात 3 बाद 88 धावा जमविल्या होत्या.
या कसोटीत पाकचा पहिला डाव 211 धावांवर आटोपल्यानंतर द. आफ्रिकेने 3 बाद 82 या धावसंख्येवरुन खेळाला पुढे सुरुवात केली. मारक्रेम आणि बॉश्च यांच्या अर्धशतकांमुळे द. आफ्रिकेने पहिल्या डावात 301 धावांपर्य्तं मजल मारली. 47 धावांवर नाबाद राहिलेल्या मारक्रेमने खेळाला पुढे सुरूवात केली. त्याने बवुमा समवेत चौथ्या गड्यासाठी 70 धावांची भागिदारी केली. बवुमाने 4 चौकारांसह 31 धावा केल्या. बेडींग हॅमने 5 चौकारांसह 30 धावा जमविल्या. व्हेरेनी आणि जेनसन हे दोन फलंदाज लवकर बाद झाले. मारक्रेम आठव्या गड्याच्या रुपात बाद झाला. त्याने 144 चेंडूत 15 चौकारांसह 89 धावा जमविल्या. पॅटर्सन आणि बॉश्च यांनी शेवटच्या गड्यासाठी 47 धावांची भागिदारी केल्याने द. आफ्रिकेने 300 धावांचा टप्पा ओलांडला. पाकतर्फे नसिम शहा व खुर्रम शहजाद यांनी प्रत्येकी 3 तर अमिर जमालने 2 तसेच मोहम्मद अब्बास आणि सईम अयुब यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
90 धावांनी पिछाडीवर असलेल्या पाकने आपल्या दुसऱ्या डावाला सुरुवात केली आणि त्यांनी 22 षटकात 3 बाद 88 धावा जमविल्या. सलामीच्या सईम अयुबने 6 चौकारांसह 28, कर्णधार शान मसुदने 4 चौकारांसह 28, कमरान गुलाने 4 धावा केल्या. बाबर आझम 2 चौकारांसह 16 तर सौद शकील 2 चौकारांसह 8 धावांवर खेळत आहे. पाकचा संघ अद्याप फक्त दोन धावांनी पिछाडीवर आहे. द. आफ्रिकेतर्फे जेनसेनने 17 धावांत 2 तर रबाडाने 31 धावांत 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक : पाक प. डाव 211, द. आफ्रिका प. डाव 73.4 षटकात सर्वबाद 301 (मारक्रेम 89, बॉश्च नाबाद 81, बेडींगहॅम 30, बवुमा 31, रबाडा 13, पॅटर्सन 12, अवांतर 22, शहजाद 3-75, नसीम शहा 3-92, अमिर जमाल 2-36, मोहम्मद अब्बास 1-79, सईम अयुब 1-3), पाक दु. डाव 22 षटकात 3 बाद 88 (सईम अयुब 28, शान मसुद 28, बाबर अझम खेळत आहे 16, कमरान गुलाम 13, सौद शकील खेळत आहे 8, जेनसेन 2-17, रबाडा 1-31)









