वृत्तसंस्था/ जोहान्सबर्ग
दक्षिण आफ्रिकेच्या व्हाईटबॉल क्रिकेट संघाचे प्रमुख प्रशिक्षक रॉब वॉल्टर यांनी वैयक्तिक कारणासाठी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. 67 वनडे व टी-20 सामन्यात त्यांनी हे पद सांभाळले होते.
49 वर्षीय वॉल्टर यांच्या कार्यकाळात दक्षिण आफ्रिका संघाने 2024 मध्ये झालेल्या पुरुषांच्या टी-20 विश्वचषक स्पर्धेची पहिल्यांच अंतिम फेरी गाठत इतिहास रचला होता. या स्पर्धेत त्यांनी उपविजेतेपद मिळविताना सलग आठ सामने जिंकले होते. 36 वनडे व 31 टी-20 सामन्यांत त्यांच्या मार्गदर्शनाखाली द.आफ्रिका संघाने नेदरलँड्स, ऑस्ट्रेलिया, आयर्लंड, पाकिस्तान या संघांविरुद्ध मालिकाविजय मिळविला. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी ही त्यांची शेवटची स्पर्धा होती. या स्पर्धेत संघाने उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती. पण न्यूझीलंडकडून त्यांना हार पत्करावी लागली होती.









