वृत्तसंस्था/ कार्डिफ
रिली रॉस्सो आणि फिरकी गोलंदाज तबरेज शम्सी यांच्या शानदार कामगिरीच्या जोरावर गुरुवारी येथ झालेल्या दुसऱया टी-20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेने यजमान इंग्लंडचा 58 धावांनी पराभव करत तीन सामन्यांच्या या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. नाबाद 96 धावा झळकविणाऱया रॉस्सोला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले.
या दुसऱया सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून दक्षिण आफ्रिकेला प्रथम फलंदाजी दिली. दक्षिण आफ्रिकेने 20 षटकात 3 बाद 207 धावा जमविल्यानंतर इंग्लंडचा डाव 16.4 षटकात 149 धावांत आटोपला.
दक्षिण आफ्रिकेच्या डावात रिली रॉस्सोने 55 चेंडूत 5 षटकार आणि 10 चौकारासह नाबाद 96 धावा झळकविल्या. हेंड्रिक्सने 32 चेंडूत 2 षटकार आणि 3 चौकारासह 53, क्लासेनने 10 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकारासह 19, डि कॉकने 11 चेंडूत 2 चौकारासह 15 आणि स्टब्जने 12 चेंडूत 1 षटकारासह नाबाद 15 धावा केल्या. हेंड्रिक्स आणि रॉस्सो यांनी दुसऱया गडय़ासाठी 73 धावांची भागीदारी केली. रॉस्सोने स्टब्जसमवेत. चौथ्या गडय़ासाठी अभेद्य 64 धावांची भर घातली. दक्षिण आफ्रिकेच्या डावात 9 षटकार आणि 16 चौकार नोंदविले गेले. इंग्लंडतर्फे मोईन अली, ग्लेसन आणि जॉर्डन यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. हेंड्रिक्सचे टी-20 प्रकारातील हे नववे अर्धशतक आहे.
प्रत्युत्तरादाखल खेळताना दक्षिण आफ्रिकेच्या अचूक गोलंदाजीसमोर इंग्लंडचे फलंदाज ठराविक अंतराने बाद झाले. जेसन रॉयने 3 चौकारासह 20, कर्णधार बटलरने 3 षटकार आणि 1 चौकारासह 14 चेंडूत 29 धावा जमविल्या. मलानने 5 धावा केल्या. मोईन अलीने 17 चेंडूत 3 चौकारासह 28, बेअरस्टोने 21 चेंडूत 4 चौकारासह 30 आणि लिव्हिंगस्टोनने 10 चेंडूत 3 चौकारासह 18 धावा जमविल्या. इंग्लंडच्या डावात 16 चौकार नोंदविले गेले. दक्षिण आफ्रिकेतर्फे शम्सीने 27 धावात 3, फेहलुक्वायोने 39 धावात 3, एन्गिडी 11 धावात 2, रबाडा आणि केशव महाराज यांनी प्रत्येकी एक बळी मिळविला.
संक्षिप्त धावफलक ः दक्षिण आफ्रिका 20 षटकात 3 बाद 207 (डि कॉक 15, हेंड्रिक्स 53, रॉस्सो नाबाद 96, क्लासेन 19, स्टब्ज नाबाद 15, मोईन अली, ग्लेसन, जॉर्डन प्रत्येकी एक बळी), इंग्लंड 16.4 षटकात सर्व बाद 149 (रॉय 20, बटलर 29, मलान 5, मोईन अली 28, बेअरस्टो 30, लिव्हिंगस्टोन 18, जॉर्डन 5, शम्सी 3-27, फेहलुक्वायो 3-39, एन्गिडी 2-11, रबाडा 1-35, केशव महाराज 1-37).









