वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क
येथे सुरू असलेल्या चॅम्पियन्स व्यावसायिक स्क्वॅश स्पर्धेत भारताचा अव्वल स्क्वॅशपटू सौरव घोषालने इजिप्तच्या युसेफ इब्राहीमचा धक्कादायक पराभव करत उपांत्य फेरी गाठली आहे. व्यावसायिक स्क्वॅश टूरवरील स्पर्धेत तब्बल तीन वर्षांनंतर सौरवने पहिल्यांदाच उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला आहे.
उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात भारताच्या 17 व्या मानांकित सौरव घोषालने इजिप्तच्या इब्राहीमचा 11-8, 7-11, 9-11, 11-6, 11-9 अशा गेम्समध्ये पराभव करत उपांत्य फेरी गाठली आहे. उपांत्य फेरीत घोषालचा सामना पेरूच्या तृतीय मानांकित दियागो इलियास बरोबर होणार आहे.









