बिग बॉस सीझन 16 मुळे चर्चेत राहिलेली अभिनेत्री सौंदर्या शर्माने बॉलिवूडमध्ये यापूर्वीच काम केले आहे. अभिनेत्री आता लवकरच हॉलिवूडच्या एका चित्रपटात दिसून येणार आहे. अभिनेत्री स्वतःच्या आगामी प्रोजेक्टसाठी अलिकडेच लॉस एंजिलिस येथे पोहोचली होती. तेथे तिने या प्रोजेक्टसाठी स्वतःची तयारी की आहे. तसेच हॉलिवूडच्या एका प्रसिद्ध दिग्दर्शकासोबत तिने चर्चा केली आहे.

सौंदर्याने न्यूयॉर्क फिल्म अकॅडमी आणि ली स्टेस्बर्ग थिएटर्स अँड फिल्म इन्स्टीटय़ूटमध्ये प्रशिक्षण घेतले आहे. याचबरोबर सौंदर्या आता एमएमएचे (मिक्स मार्शल आर्ट्स) प्रशिक्षण घेत आहे. सौंदर्याला आता एका हॉलिवूडपटाची ऑफर मिळाल्याने ती आता याकरता विशेष तयारी करत आहे. या चित्रपटाकरता तिने हॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक चाड स्टॅहेल्स्की यांची भेट घेतली आहे.
एमएमएचे प्रशिक्षण घेत आहे, लवकरच माझ्या आयुष्यात विशेष घडणार असल्याने मी अत्यंत उत्सुक आणि रोमांचित झाली आहे. अजून खूप मेहनत करावी लागणार आहे. नव्या चित्रपटासाठी लवकरच विस्तृत स्वरुपात माहिती देईन असे सौंदर्याने म्हटले आहे. सौंदर्या एखाद्या सुपर ऍक्शन धाटणीच्या चित्रपटात दिसून येणार असल्याचे मानले जात आहे. सौंदर्या अलिकडेच थँक गॉड या चित्रपटात दिसून आली होती.









