वांगू लाइफाममध्ये सुरक्षा दलांची शोध मोहीम : दोन उग्रवादी ताब्यात
वृत्तसंस्था/ इंफाळ
मणिपूरच्या वांगू लाइफाम या भागात काकचिंग पोलिसांनी शोधमोहीम राबविली आहे. या शोधमोहिमेदरम्यान घरांमधून तसेच पर्वतीय भागातून मोठ्या संख्येत अत्याधुनिक शस्त्रास्त्रs तसेच चिनी ग्रेनेड हस्तगत करण्यात आले आहेत. पोलीस अधिकाऱ्यांनी बुधवारी या मोहिमेबद्दल माहिती दिली आहे.
एके-47, इंसास रायफल, 5 एसएलआर रायफल्स, .303 रायफल (मॉडिफाइड), तीन .303 रायफल्स, दोन एसबीबीएल, 11 एचईग्रेनेड, एक चिनी हँडग्रेनेड, 6 डेटोनेटर आणि एक लोकल पाइप बॉम्ब समवेत अनेक शस्त्रास्त्रs हस्तगत झाली आहेत.
शोधमोहीमेच्या दरम्यान वांगू लाइफाम चिंग्या येथील अनेक घरांची झडती घेण्यात आली. सुरक्षा दलांच्या पथकाने पर्वतावर जात देखील शोध घेतला. यादरम्यान पर्वतीय भागातील दफनभूमीनजीक काही शस्त्रास्त्रs अन् स्फोटके ताब्यात घेण्यात आली. यापूर्वी मणिपूर पोलिसांनी सोमवारी म्यानमारच्या दोन दहशतवाद्यांना अटक केली होती.
घुसखोरांना कधीच स्वीकारणार नाही
राज्य सामान्य स्थितीच्या दिशेने वाटचाल करत आहे. लवकरच येथील लोक शांततेत राहू शकतील. काही विदेशी संघटना राज्याला लक्ष्य करण्याचा कट रचत आहेत. आमचे सरकार राज्यात अवैध स्थलांतरिताना कधीच स्वीकारणार नाहच. राज्यात राहत असलेल्या 34 स्वदेशी समुदायांनी स्वत:चे ऐतिहासिक कायम राखावेत असे मुख्यमंत्री एन. विरेन सिंह यांनी म्हटले आहे. मणिपूरचे मुख्यमंत्रीच राज्यात दंगली भडकवत आहेत. अफ्स्पा केवळ खोऱ्यातून का हटविण्यात आला, पर्वतीय जिल्ह्यांमध्ये अद्याप अफ्स्पा लागू का असा प्रश्न इंडीजिनस ट्रायबल लीडर्स फोरमने विचारला आहे. ही संघटना कुकी-जो समुदायाचे प्रतिनिधित्व करत असल्याचे मानले जाते.
दोन उग्रवाद्यांना अटक
मणिपूरच्या चुराचांदपूर येथून म्यानमारची उग्रवादी संघटना चिन कुकी लिबरेशन आर्मीच्या दोन सदस्यांना अटक करण्यात आली आहे. दोन्ही उग्रवाद्यांना भारत-म्यानमार सीमेनजीकच्या चलजंग येथून ताब्यात घेण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. या दोन्ही उग्रवाद्यांकडून एके-47, इंसास, स्नायपर आणि एम-16 रायफल्ससह 2.5 किलोग्रॅम अफू, 4.86 लाख रुपये हस्तगत करण्यात आले आहेत.









