कोल्डप्ले स्टारला करतेय डेट
प्रियांका चोप्राची नातलग राहिलेली हॉलिवूड अभिनेत्री सोफी टर्नरने जो जोनाससोबत 2019 मध्ये विवाह केला होता. परंतु 2024 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला होता. आता सोफी ही कोल्डप्ले स्टारसाब्sात रिलेशनशिपमध्ये असल्याचे समारे आले आहे. सोफी टर्नर ही गेम ऑफ थ्रोन्स या वेबसीरिजमधील भूमिकेमुळे जगभरात प्रसिद्ध आहे. क्रिस मार्टिन हा ग्वेनेथ पाल्ट्रो या पत्नीपासून विभक्त झाला होता. तर कोल्डप्लेच्या म्युझिक ऑफ द स्फीयर्स टूर अंतर्गत वेम्बलीमध्ये अनेक कार्यक्रमांसाठी तो काही काळ लंडनमध्ये वास्तव्यास होता. क्रिस देखील जवळपास 8 वर्षांपर्यंत जूनमध्ये 35 वर्षीय अभिनेत्री डकोटा जॉन्सनपासून वेगळा झाला होता. सोफी ही कोल्डप्लेची सुपरफॅन असल्याने ती क्रिसच्या प्रेमात पडली आहे. सोफी आणि क्रिसचे नाते सध्या चर्चेत आले आहे. सोफीला जो जोनासपासून दोन अपत्यं आहेत. चार वर्षांची मुलगी विला आणि दोन वर्षीय डेल्फिन यांचा सांभाळ ती एकटीच करत आहे. जोनास ब्रदर्स स्टारसोबत घटस्फोट घेतल्यावर सोफी ही ब्रिटनमध्ये वास्तव्य करत आहे. तर क्रिसही लंडनमध्ये अधिक काळ वास्तव्य करू लागला आहे. दोघेही स्वत:च्या या रिलेशनशिपवरून गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.









